माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून समाजमाध्यमांसाठी सूचनापत्रक जारी   

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव पाहता भारत सरकार आवश्यक पावले उचलत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने समाजमाध्यमांसाठी सूचनापत्रक जारी केले आहे. 
 
या पत्रकात माध्यमांना संवेदनशील बातम्या प्रसारित करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि वस्तुस्थितीची पुष्टी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जातीय सलोखा बिघडू शकेल किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित करू नयेत, असे आवाहन सरकारने माध्यम वाहिन्यांना केले आहे. विशेषतः त्यांना अफवा पसरवण्यापासून आणि सोशल सामाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अपुष्ट बातम्या टाळण्यास सांगितले आहे.
 
पत्रामध्ये दिलेल्या सूचनांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे
 
मीडिया चॅनेलने केवळ सरकार किंवा अधिकृत एजन्सीद्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडू शकतील अशा बातम्या प्रसारित करण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खात्री करून घ्यावी. सरकारने मीडिया वाहिन्यांना राष्ट्रीय हित आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. प्रसारमाध्यमांची जबाबदारी केवळ बातम्या देणे नसून समाजात सकारात्मक आणि जबाबदार संदेश पोहोचवणे ही आहे, याची आठवणही त्यांना करून देण्यात आली आहे. या संवेदनशील वेळी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, परिस्थिती आणखी बिघडू नये,यासाठी त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मत आहे.

Related Articles